+918048031859
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

केस अकाली पांढरे का होतात? मेलानिन नावाच्या रंगद्रव्यामुळे केसांना रंग मिळतो हे आपल्याला माहीतच आहे. केसातील मेलानिनची पातळी जेवढी अधिक, तेवढे तुमचे केस काळे (किंवा गडद रंगाचे) असतात. वाढत्या वयासोबत मेलानिनची पातळी खालावणे सामान्य आहे. पण अलीकडे हे खूप लवकर घडू लागले आहे. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येला तोंड देणाऱ्यांची संख्या भारतातही वाढत आहे. मात्र असं का होत आहे? त्याबाबत जाणून घेऊयात... 🧐 *केस अकाली पांढरे होण्याची कारणे काय?* : 1) *आनुवंशिक कारणे* : केस अकाली पांढरे होण्याचे कारण आनुवंशिकता/जनुकीय असते तेव्हा त्याबद्दल फारसे काही करता येत नाही. ते होतातच. 2) *कमतरता* : झिंक, कॉपर, ब जीवनसत्व यांच्या कमतरतेमुळे केस अकाली पिकू (पांढरे होऊ) शकतात. समतोल आहार आणि सप्लिमेंट्स घेतल्यास हे टाळण्यात खरोखर मदत होईल. 3) *तणाव* : केस अकाली पांढरे होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे तणाव. तेव्हा तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा, विश्रांती घ्या, व्यायाम करा आणि डोक्याला मसाज करून घ्या. 4) *धूम्रपान* : केस पांढरे होण्यामध्ये धूम्रपानाचा वाटा खूप मोठा असू शकतो. तुम्ही धूम्रपान करत असाल, तर ते सोडण्याची हीच वेळ आहे. 💁♂ *केसांचे अकाली पिकणे टाळण्यासाठी काय करू शकता?* : 1) *शरीरात ओलावा ठेवा* : शरीरात पुरेसे पाणी नसेल म्हणजेच ते डिहायड्रेटेड असेल तर केसांपर्यंत आवश्यक पोषक घटक पोहचू शकत नाहीत, त्यामुळे, केसगळती किंवा केस पिकण्याची शक्यता वाढते. 2) *व्यायाम* : नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस साहजिकच अधिक निरोगी होतात. 3) *तेलाने मसाज* : आठवड्यातून एकदा टाळूला भृंग किंवा बदाम तेल, ऑलिव्ह तेल आदींचा वापर करून मसाज करा. 4) *तुमचा शॅम्पू बदला* : पोषकांनी समृद्ध आणि सौम्य प्रकारातील शॅम्पू वापरा. ऑरगॅनिक शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पू सर्वोत्तम. 5) *'क' जीवनसत्वाचा समावेश वाढवा* : केस पिकणे टाळण्यासाठी क जीवनसत्वाचे सेवन हा सर्वात प्रभावी उपाय समजला जातो. तुमच्या आहारात संत्री, तसेच टरबुज-खरबुज वर्गातील फळांचा समावेश करा. 6) *मासे अधिक प्रमाणात खा* : मासे सेलेनियम आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. हे दोन्ही घटक केसांसाठी उत्तम आहेत.