+918048031859
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

अॅक्युपंक्चर Acupuncture Needle सुईने टोचण्याचे तंत्र चिनी औषधोपचारात सुईने टोचण्याचे तंत्र हे एक प्राचिन आणि स्वाभाविक वैशिष्ट्य दाखविणारे कौशल्य आहे. प्राचिन काळापासून हे कौशल्य दोन्ही गंभीर आणि जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे बहुमुल्य तंत्र होय. अश्मयुगात दगडी सुयांचा वापर होत असे. एस्किमो लोक आजारावर उपचार करण्यासाठी टोकदार/अणुकुचीदार दगडांचा वापर करतात. युध्दाच्या काळात शरीराच्या काही विशिष्ट भागांवर बाण लागून जखमी झालेल्या सैनिकांना बरे करण्यासाठी शरीरातील दुस-या अवयवांना झालेल्या आजाराचा वापर करीत. तेंव्हा उत्सुकतेपोटी माणसांना आश्चर्य वाटायला लागले की, त्वचेच्या पृष्टभागावर टोचून आणि त्यामुळे आतील अवयव बरे होतात, ह्यात काही नाते तर नाही ना? रोग परिक्षा प्रत्येकाच्या ताकदीतील असमातोलपणाच्या रोग परीक्षेची सुरूवात सुई टोचून होते. आरोग्याचा विचार करता असे लक्षात येते कि, कार्यरत/कार्यक्षम ताकदीचा सुलभ प्रवाह हा कालवा अथवा मार्ग यांच्या जाळ्यातून होतो. जो शरीरातील सर्व अवयवांना जोडून आणि एकत्रित करून पुर्णत्व देतो सत्याला ("chi") असे देखील म्हणतात. आतील प्रत्येक अवयवाला त्याचा स्वत:चा सुसंगत करण्याचा मार्ग आहे. जर एखाद्या कारणाने ताकदीचा प्रवाहाने वाहणे थांबेल अथवा अडथळे आले तर त्याच्याशी संबंधीत असलेले अवयव अथवा मार्गाचे काम तितके परिणामकारक न होता आरोग्यात बिघाड निर्माण होऊ शकतो. जर एखादा अवयव अथवा मार्गाचे कार्य अनेक प्रकारे उघड होत असेल, उदा. अनेक प्रकारे उत्पन्न होणा-या लक्षणांवरून, मुखड्याचा रंग, भावनिक प्रदेश, मुळात बदल होणे आणि त्वचा, मांसपेशींचा मार्गाद्वारे होणा-या स्पर्शाचे ज्ञान होणे, जिभेचा आकार, आणि बाहूच्या मध्यापासून असणाऱ्या नाडीचे ज्ञान होणे अथवा नाडीची परीक्षा करणे. (मनगटाच्या धमनीच्या वर विशिष्ट जागी) रोग परिक्षेचे मुख्य उद्दिष्ट्य हे कि, संपुर्ण शरीर रचनेचा तोल आणि ताकदीचा सुलभ प्रवाह पुर्ववत करणे, त्यासाठी अवयवासाठी अथवा मार्गासाठी लागणारी सुव्यवस्था निर्माण करणे. निष्णातपणे करण्याची पध्दत या ताकदीच्या प्रवाहाला चीन मध्ये QI (उच्चार chi), जपानमध्ये त्याला kI आणि आर्युवेदात प्राण ह्या नावाने ओळखले जाते. या ताकदीत सकारात्मक आणि नकारात्मक घटक ज्याला Yang आणि Yin असे संबोधले जाते. सामान्या माणसात हे घटक संतुलित प्रमाणत असतात. जर ताकदीच्या प्रवाहात अडथळा आला , एखाद्या अवयवात ताकदीचे प्रमाण जास्त किंवा कमी झाले, अथवा सकारात्मक आणि नकारात्मक घटकात असंतुलीतपणा वाढला तर माणुस आजारी पडतो. शरीराच्या पृष्ठभागावर जवळ पास हजारो बिंदू असतात. रोग परीक्षेनतंर सहा ते दहा बिंदू उपचारासाठी निवडले जातात. या बिंदूत पातळ, छोट्या सुया टोचल्या जातात. विद्युत घटाद्वारे चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने या सुया उद्दिपीत केल्या जातात. ९ volts चा प्रचलीत वापर करतात, तो निरूपद्रवी असतो. सुया १५-२० मिनिटानंतर काढल्या जातात. याला वेळापत्रकाला बसणे असे म्हणतात सामान्यपणे दिवसात एकदाच बसणे, असे १० दिवसाचे व्यवस्थापन याला एक मालीका म्हणतात जर आवश्यकता असल्यास पुढील मालीका सुरू करण्यापूर्वी १० दिवसानंतर सिंहावलोकन केले जाते.